संगमनेर विशाल वाकचौरे जागतिक बंधुता दिनानिमित्त शहरात “रक्तदान मोहीम २०२५ आपका रक्त,जीवन का वरदान” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करून “रक्तदान हेच, श्रेष्ठ दान” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे.
हे रक्तदान शिबिर २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत ब्रह्माकुमारी तपस्या भवन,गोल्डन सिटी,संगमनेर येथे होणार आहे.इच्छुकांनी सहभागासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नोंदणीसाठी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करावा,असे आयोजकांनी कळविले आहे.
हा उपक्रम राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ ब्रह्माकुमारी संगमनेर व समाज सेवा विभाग (आरइआरएफ) व लायन्स क्लब ऑफ,संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
रक्तदानामुळे जीवन वाचते, आशा निर्माण होते आणि अनोळखी लोकांमध्ये बंधुभावाची नवी नाळ जुळते. म्हणूनच या उपक्रमाला समाजातील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल,अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त यावेळी केली आहे.