श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी तथा इंडियन रेड क्रॉसचे अध्यक्ष किरण सावंत पाटील यांना महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अहिल्यांनगर यांचे हस्ते उत्कृष्ठ उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यानिमित्त इंडियन रेड सोसायटीच्या वतीने किरण सावंत पा.यांचा रेड क्रॉस उपाध्यक्ष तथा मिलिंदकुमार वाघ यांचे हस्ते सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले यावेळी भरत कुंकुलोळ,सुनील साळवे प्रवीण साळवे,पोपट शेळके,सुरांजन साळवे,श्रावण भोसले. सुरेश वाघुले,सचिन चंदन,सुरजन साळवे विश्वास भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते.