नाशिक दिनकर गायकवाड वै. ह.भ.प.नथुसिग बाबा राजपुत यांच्या स्मरणार्थ श्री संत सेवा पुरस्कार दिंडोरी येथील सुशीला गणपतराव बोरसे यांना प्रदान करण्यात आला.
विंचुर येथे झालेल्या पुरस्कार वितरणात सुशीला बोरसे यांचा समावेश असुन त्यांना वा. शि. संस्था आळंदी अध्यापक ह.प.भ. परमेश्वर महाराज जायभावे, विश्वस्त
ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुशीला बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ,खासदार भास्कर भगरे, मा.आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, नगराध्यक्षा सुनीता लहांगे, उपनगराध्यक्षा माधुरी सांळूखे आदींनी अभिनंदन केले आहे.
