ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲट तात्काळ लागू करा-अत्याचार विरोधी कृती समिती
नाशिक दिनकर गायकवाड भिवंडी येथील वकील संघाचे पदाधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक नेते, रिपाइं(सेक्युलर) पक्षाचे पदाधिकारी ॲड.किरण चन्ने यांचेवर खुलेआम,सार्वजनिक ठिकाणी भररस्त्यात तलवार,चाकू व घातक हत्यारांनी पूर्व नियोजित पणे कट रचून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यातून ते अंगरक्षक बालंबाल बचावले सदर घटनेचा निषेध करुन या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की सदरचा हल्ला हा भाजपचे आमदार चौगुले यांचे सांगणे वरून करण्यात आला आहे असा संशय आहे सदर घटनेतील हल्लेखोर अद्याप फरार आहे, त्यांचेवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हयाची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करा तसेच राज्यातील वकीलांवर होणारे हल्ल्यांच्या घटनेत वाढ झालेली असल्याने " ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट " तात्काळ लागू करावा,अन्यथा राज्यभर उग्र स्वरुपाचे आंदोलनाचा इशारा अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी अत्याचार विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲड.राहुल विष्णू तुपलोंढे,ॲड.एस.व्ही.वाघमारे,ॲड. एस.आर.कांबळे,घंटागाडी संघटना कामगार नेते महादेव खुडे,सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
