मुंबई पोलिस सूरज ढाकणे यांच्या हस्ते तळेगाव दिंडोरीत बस थांब्याचे लोकार्पण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे नवीन बस थांब्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या थांब्यामुळे परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी,शेतकरी वर्गाला प्रवासाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच प्रवीण कथार,पोलीस पाटील रोशन परदेशी, संतोष कथार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कांतिलाल घुगे,भाजप दिंडोरी तालुका उपाध्यक्ष दिगंबर ढाकणे, मुंबई रेल्वे पोलिस सुरज ढाकणे यांच्या हस्ते फलकाचे पुजन करून व श्रीफळ वाहण्यात आले.

या थांब्याच्या स्थापनेसाठी केशव घुगे यांनी विशेष प्रयत्न केले आहे.नाशिक सिटी लिंक बस थांब्याजवळ थांबून बस चालक रवींद्र सोनवणे व वाहक करण डोंगरे यांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या बस थांब्यामुळे परिसरातील महाविद्यालयीन, शेतकरी, नागरिकांना प्रवासासाठी अधिक सुरक्षित व सुलभ सुविधा मिळणार आहे.

याप्रसंगी सोसायटीचे मा.अध्यक्ष गोविंद ढाकणे,
मा.उपसरपंच बाळासाहेब चकोर,मा. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र ढाकणे, सोसायटीचे संचालक सुनिल ढाकणे, सुरेश घुगे, रविंद्र ढाकणे, दिगंबर ढाकणे अजिंक्य ढाकणे, गोकुळ चौधरी,प्रशांत ढाकणे,अमोल ढाकणे,संजय ढाकणे, धनंजय ढाकणे,संदिप ढाकणे, गणेश ढाकणे, बाळू निंबाळकर आदीसह ग्रामस्थ, विद्यार्थी अस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!