लालाय्लू बृहद कांदबरीकार संतोष भालेराव यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पा.जिल्हा विशेष पुरस्काराने सन्मानित
लोणी प्नतिनिधी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिना निमित्त देण्यात येणारा साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण डॉ.मिलींद जोशी यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे यांना डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात नुकताच प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे यंदाचे हे ३५ वे वर्ष असून, या वर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील जीवन गौरव पुरस्कार कोल्हापुर येथील जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनिलकुमार लवटे यांना एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ.मिनाक्षी पाटील, डॉ.एच.व्ही देशपांडे यांना आणि नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप आणि कलागौरव पुरस्कार अंताबंर शिरढोनकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना देवून गौरविण्यात आले. विशेष साहित्य पुरस्काराने एच.व्ही देशपांडे, अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्काराने संतोष भालेराव, जिल्हा विशेष साहित्य पुरस्काराने श्रीकांत कासट आणि प्रवरा परिसर विशेष साहित्य पुरस्काराने संदिप तपासे, वंसतराव ठोंबरे यांना देवून गौरविण्यात आले.
प्रसंगी केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार.मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, वैभवराव पिचड, पांडुरंग अभंग,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, डॉ.राजेंद्र विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा. यांच्यासह राज्यातून आणि जिल्ह्यातून कार्यकर्ते, साहित्यीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.