शिर्डी प्नतिनिधी रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर छत्तीसगड मधील बिलासपूर येथून ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित, तब्बल ३५ किलो वजनाची आणि ३० फूट लांब व ६ फूट रुंद अशी भव्य राखी श्री साई चरणी अर्पण करण्यात आली.
ही अनोखी राखी सुप्रसिद्ध कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी केवळ १५ दिवसांत साकारली असून, फायबर प्लाय,मोती,जरी,बुटी आदी आकर्षक सजावटीच्या साहित्याचा नाजूक वापर करून ती तयार करण्यात आली आहे.
या राखीचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.