नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ मर्या. मुंबई कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
या लाभाथ्यर्थ्यांची कर्ज परताव्याची विहित मुदत संपून शिल्लक रकमेची परतफेड अद्याप बाकी आहे. अशा संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी योजना नव्याने राबविण्यात येत आहे.या योजनेचा जास्तीत जास्त थकबाकीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय नाशिकचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
