त्रस्त जनतेचा कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील
जऊळके येथील करीना एंटरप्राईजेस या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान तसेच आरोग्य खराब होत आहे.त्यामुळे दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा शेतक-यांनी दिला आहे. छाया रेखांकन-ईश्वरी भागवत
जऊळके दिंडोरी येथील गट नंबर एक मध्ये करीना एंटरप्राइजेस ही कौट बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूला असलेल्या गट क्रमांक दोन चे मालक विठाबाई संपत शिरसाठ,सिंधुबाई रंगनाथ शिरसाठ,यशवंत रंगनाथ शिरसाठ,गटनंबर तीनचे मालक जयश्री शिवाजी बोरस्ते,कीर्ती भूषण बोरस्ते,सुमन शंकर
शिरसाठ,गट नंबर चार चे मालक दत्तात्रय सुखदेव जोंधळे या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. २४ तास चालणाऱ्या या कंपनीच्या मशिनरीच्या आवाजाने देखील येथील नागरिक त्रस्त आहेत. या दुषित पाण्यामुळे लहान मुले देखील आजारी पडत आहे. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत
प्रशासनास वारंवार तक्रार करून देखील अनेक वर्षापासून या शेतकऱ्यांचा त्रास कमी होत नाही. या कंपनीच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे का? म्हणून या कंपनीवर कुठलीही कारवाई केली जात नाही, असे असेल तर येथील शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्न पडला पडला आहे. कंपनीवर कारवाई
केली नाही तर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर येथील शेतकरी व गावकरी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. आता या शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी कुणाल बागुल श्रीधर गांगुर्डे, शांताराम जोंधळे, कैलास शिरसाठ, यशवंत शिरसाठ, सोमनाथ बोरस्ते,सोमनाथ जोंधळे, संतोष जोंधळे,तानाजी जोंधळे, राघोजी भांगरेक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वतार, पंकज गांगुर्डे, शंकर गोतरणे हिरामण जोंधळे, भाऊसाहेब जोंधळे, अशोक जोंधळे, चंद्रभान शिरसाठ, सचिन शिरसाठ, विजय शिरसाठ, मनोज शिरसाठ, रोहित शिरसाठ, वेदांत चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.
