मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल धक्कादायक

Cityline Media
0
पुराव्या अभावी मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष

मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने महत्त्वाचे पुरावे नाहीत आणि पंचनामा व्यवस्थित झाला नाही यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.या प्रकरणातील सातही आरोपींना न्यायालयाने निर्दोष असल्याचे सांगितले.
या प्रकरणात भोपाळच्या मा.खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने नुकताच निकाल सुनावण्यात आला. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. तब्बल १७ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात निकाल लागला.बॉम्ब स्फोट झाल्याचे सरकारी

पक्षाने सिद्ध केले. पण स्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने सांगितले. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटींचे वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही,असे निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले.चेसीस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकांसंदर्भातही यंत्रणेचे दाख्यावर वायालयाचे समाधान झाले नाही. आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचे न्यायालयाने सांगितले. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणले याचा पुरावा नाही, असे ही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!