नाशिक दिनकर गायकवाड शहरातील डेंग्यू रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.जूनमध्ये २५ वर असलेली डेंग्यू रुग्णसंख्या जुलै महिन्यात तिपटीने वाढली आहे.
जुलैच्या गेल्या २८ दिवसांत तब्बल ७५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.त्यामध्ये नाशिक-रोडमध्ये सर्वाधिक २३, तर त्या खालोखाल सातपूरमधील १४ रुग्णांचा समावेश आहे. पावसाळा सुरू होताच शहरात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला आहे.मे महिन्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढत आहे. जानेवारीत ३७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीत ३२, २१, एप्रिल १५, मे मार्च
महिन्यात १७, तर जून महिन्यात २५ रुग्ण आढळले होते. जुलैच्या गेल्या २८ दिवसांतच डेंग्यू रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे ७५ रुग्ण आढळले आहेत.त्यात नाशिकरोड विभागातील सर्वाधिक २३ रुग्णांचा समावेश आहे.
डेंग्यूच्या अळ्या तपासण्यासाठी सहा विभागांत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली. नाशिक शहरात मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे
ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्यामुळे जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले. डेंग्यू आजाराच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस,इजिप्ती या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या,निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. या स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. तसेच मोकळे
विभागनिहाय डेंग्यू रूग्णसंख्या- नाशिकरोड २३ सिडको १२ पंचवटी ०७ नाशिक पूर्व ११ सातपूर १४ नाशिक पश्चिम ०८ भूखंड,उद्याने, मैदाने या ठिकाणी गवत वाढून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच हवामान बदल झाल्यामुळे डासांना पोषक वातावरण निर्माण झाले.पंचवटी, जेलरोड, म्हाडा कॉलनी या परिसरात उघड्या सार्वजनिक शौचालयांमुळे डासांचा उद्रेक वाढला आहे.