वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील प्रिंप्री लौंकी अजमपूर येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवरा कलाध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध ललित कला स्पर्धत प्रवरा माध्यमि या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्राची विनायक दातीर हिने चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यालयाच्या व गावच्या यशाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला.या उज्वल यशाबद्दल पालकमंत्री
नामदार राधाकृष्ण विखे पा.जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा.डॉ.सुजय विखे पा.यांच्याकडून या उज्वल यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक तायगा शिंदे,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक वृंद व समस्त ग्रामस्थ पिंप्री लौकी अजमपुर यांच्याकडून मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.
