दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते खळीतील सहकार महर्षी थोरात माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

Cityline Media
0

दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालय खळी येथे ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी यावर्षी प्रथम येणाऱ्या सार्थक दत्तात्रय लोहाळे या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष भास्कर पाराजी चकोर होते तर व्यासपीठावर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे‌.

सह्याद्री विद्या प्रसारक समाज संस्थेचे नवनिर्वाचित संचालक चंद्रभान तांबे सुरेश नागरे सरपंच विलास वाघमारे सेवा सोसायटीचे अध्यक्ष सूर्यभान सानप उपाध्यक्ष हौशीराम नागरे तंटामुक्ती अध्यक्ष तथा भोलेनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब लहानू नागरे 

स्कूल कमिटीचे सदस्य सुनील नागरे मा.अध्यक्ष साहेबराव तांबे सेवा सोसायटीचे सहसचिव शिवाजी भिकाजी वाघमारे छबू आनंदा नागरे दिगंबर लोहाळे रंजनाबाई लोहाळे आदी प्रमुख गावातील मान्यवर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अठरा वर्ष पुढील मुलींचे लग्न प्रतिज्ञाचे वाचन मुख्याध्यापक प्राथमिक शाळेचे दत्तात्रय दिवेकर यांनी प्रतिज्ञाचे वाचन केले यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री सानप यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकात शाळेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत भा भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

यानंतर इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी इंग्लिश या तीनही भाषांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करण्यात आले तसेच बालविवाह रोखणे अंमलबजावणी करणे त्याची प्रतिज्ञा उपस्थित मान्यवरांसह सर्व ग्रामस्थांना देण्यात आली.

यावेळी लबडे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री.हजारे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळीचे उपशिक्षक श्री.वावरे  सहशिक्षिका श्रीमती बोराडे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा आरोग्य सेविका श्रीमती सौदामिनी म्हकांळे पोलीस पाटील मच्छिंद्र चकोर आदी मान्यवरांसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत कवायत स्काऊट आदी कार्यक्रम पार पडले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!