श्रीरामपूरच्या सकल हिंदू समाजातील बहिणींकडून रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायद्याची प्रशासनाकडे मागणी
श्रीरामपूर,दिपक कदम रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त श्रीरामपूर शहरातील सकल हिंदू समाजातील बहिणींनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. बहिणींनी शहराचे नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना राखी बांधून ‘लव्ह जिहाद’सारख्या घातक प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी ‘ओवाळणीची भेट’ म्हणून सादर केली.बहिणींनी प्रशासनाशी संवाद साधताना सांगितले की, “गेल्या काही वर्षांत प्रेमसंबंधांच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’सारखा रॅकेट राज्यात फोफावला आहे.यात हिंदू मुलींना फसवून धर्मांतर घडवून आणले जाते, त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण केले जाते आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते.
अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून समाजाचे अपरिमित नुकसान होत आहे.”त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या प्रवृत्तीवर कठोर कायद्याशिवाय आळा घालता येणार नाही. त्यामुळे या रक्षाबंधनाच्या दिवशी आमची एकच ओवाळणी – लव्ह जिहाद विरोधी कायदा – हीच आहे.”या निवेदनाची प्रशासनाने नोंद घेतली असून,वरिष्ठांकडे मागणी पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला सकल हिंदू समाजातील महिला,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या भावबंधात बहिणींच्या या ठाम आणि गंभीर मागणीमुळे उत्सवाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.