मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महायुती सरकार मधल्या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करुन महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबवावी,ह्यासाठी आज शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जोरदार निदर्शने करण्यात आले.
प्रसंगी राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी भ्रष्ट महायुती सरकारला धारेवर धरले.ह्यावेळी युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत,शिवसेना नेते आमदार ॲड.अनिल परब, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव,शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू तसेच शिवसेना उपनेते, सचिव, आमदार, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
