शालेय विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Cityline Media
0
शिव विद्या प्रतिष्ठान व सन्मान नागरी बहुउद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम 

आश्वी संजय गायकवाड जनतेच्या सेवेचे व्रत घेतलेल्या शिव विद्या प्रतिष्ठान व सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास व शाश्वत उपजिवीका या मुद्द्यांवर महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत आहे. संस्थांच्या पुढाकाराने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन,महिला बचतगट उभारणी, शेती मार्गदर्शन,पशुधन व्यवस्थापन, बाल पंचायत असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत असे संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर यांनी सांगितले.
संगमनेर व राहाता तालुक्यातील ह्या संस्था लोक सहभागातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत.नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाढ बुद्रुक आणि जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा दाढ बुद्रुक येथील पाहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, असल्याची माहिती संस्था प्रकल्प व्यवस्थापक संतोष वंजारी यांनी दिली
प्रसंगी मुख्याध्यापिका उषा पाळंदे उर्दूच्या  मुख्याध्यापिका यास्मीन शेख, केंद्र प्रमुख कानिफनाथ कोळेकर, केंद्र सहाय्यक संजय कारभारी, उपमुख्याध्यापक सचिन डहाळे, तानाजी गंभीरे, युवा प्रशिक्षणार्थी शुभम पाळंदे,ताई घोडेकर, सहाय्यक अनिता रूखवद, ग्रामस्थ अलताफ पठाण, बिलाल पठाण, चाॅंद,अरमान शेख, खलील शेख, चित्रपट निर्माते विनायक साळवे, युवा कार्यकर्ते अक्रम शेख, असलम शेख या सर्वांच्या सहकार्याने  कार्यक्रम उत्तमपणे पार पडला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!