आश्वी संजय गायकवाड अहिल्यानगर जिल्ह्यात स्व भाग भांडलावर चालणाऱ्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सभासदांच्या सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी महावितरण कंपनीत संगमनेर विभागात,आश्वी कक्ष कार्यालयात कार्यरत असणारे.हेमंत सूर्यवंशी यांची यांची नुकतीच निवड संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी राजेंद्र क्षीरसागर,अमोल आभाळे, अनिल नजन, गणेश कुंभारे, रविकांत सरोवरे,राहुल वरघंटे,अशोक सोनवणे,अशोक पालवे,लक्ष्मण वंधावणे,मनोरमा कळंबे, धरती घबाडे आदी संचालक उपस्थित होते.सर्वांच्या उपस्थिती हेमंत सूर्यवंशी यांना तज्ञ संचालक पदावर निवडीची पत्र बहाल करण्यात आले.
हेमंत सूर्यवंशी यांनी महावितरण कंपनीत पंधरा वर्ष सेवा करत असताना , एम.कॉम.,जी.डी.सी अँड ए.,एम.बी.ए व इलेक्ट्रिकल इंजिनिअर अशा विविध पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. तसेच महावितरण कंपनी हेमंत सूर्यवंशी त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल महावितरणचा मानाचा समजला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कारही प्रदान केलेला आहे.
या निवडी बद्दल हेमंत सूर्यवंशी यांचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टमवार साहेब, आश्वी कक्ष कार्यालयातील सहाय्यक अभियंता अक्षय विखे, कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळे ,प्रदेश प्रभारी जगदाळे ,वरिष्ठ पदाधिकारी तसेच आश्वी कक्ष कार्यालयातील सर्व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
