आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरेच्या कला वाणिज्य विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आश्वी बुद्रुक येथील पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना राखी बांधून पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
पोलिस निरीक्षक संजय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे त्याच बरोबर इतर पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसंगी प्रा.देविदास दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आदिनाथ घोलप,प्रा. दत्तात्रय लोखंडे,प्रा.गणेश खेमनर,प्रा. गौरी क्षीरसागर, रामदास ताजने यांच्या समवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.