नाशिक दिनकर गायकवाड लग्नाचे आमिष दाखवून मजुराने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी दीपककुमार रमेशकुमार पाल (वय २१, रा. नाशिकरोड) हा मजुरी करतो. सन २०२४ च्या गणपती
उत्सवापासून त्याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढविली.नंतर त्याने स्वतःच्या घरी व फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तू याबाबत कोणाला काही सांगितलेस, तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन,अशी धमकी देत तो
तिच्यावर अत्याचार करीत राहिला.यातून ती गरोदर राहिल्याने ही बाब घरच्यांच्या लक्षात आली.या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दीपककुमार पाल याला अटक केली आहे.याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.