-संगमनेर प्रांत कार्यालयासमोर महायुतीचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा
-चंदनापुरी घाटाजवळ रस्ता रोको; हिंसक वळण आटोक्यात
संगमनेर संपत भोसले संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या कार्यक्रमात श्री गणेशाची आरती करून स्वतःच्या वाहनाकडे जात असताना खांडगाव येथील प्रकाश आप्पासाहेब गुंजाळ हा ग्रामपंचायत सदस्य व मा.सरपंच यांच असून तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांचा कार्यकर्ता आहे या व्यक्तीने आमदार अमोल खताळ यांचा गळा वळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीस कार्यकर्ते व सुरक्षा कर्मचारी यांनी तिथेच पकडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सूडाच्या राजकारणाचा घृणास्पद पॅटर्न समोर आला आहे.त्यामुळे आ.अमोल खताळ यांच्या समर्थकांनी मोर्चा काढून हातात कळ्या रंगाच्या फित बांधून निषेध व्यक्त केला.
या निंदाजनक घटनेचा निषेध व्यक्त सर्वात प्रथम साकुर पठार भागामध्ये संगमनेर तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष.गुलाब भोसले यांच्या नेतृत्वाखाली चंदनपुरी घाट या ठिकाणी रस्त्यामध्ये टायर जाळून रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर यांच्या सह पठार भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी प्रांतकार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या सह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते .
संबंधित घटनेबाबत.गुलाब भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की की दिनांक २१ ऑगस्ट रोजी संगमनेर मध्ये कथाकथित शांती मोर्चा झाला होता या मोर्चा मधून मा. आ.बाळासाहेब थोरात विद्यमान आ..सत्यजित तांबे ,जयश्री थोरात यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना चिथावणी देत.
कार्यकर्त्यांचे माथे भडकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण केला त्यामुळे कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदारअमोल खताळ व त्यांच्या कार्यकर्त्याला त्रास देण्यास सुरुवात केली व आमदारांवर हल्ला केला म्हणून त्या माथेफिरूचा मुख्य आका कोण? याची देखील चौकशी झाली पाहिजे.
पठार भागातील वरवंडी या गावच्या युवकांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊ यांना देखील असे सांगितले आहे की जर गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली नाही तर संगमनेर पोलीस ठाण्यासमोर समोर उपोषण आंदोलन करणार आहोत असे देखील सांगितले व वरवंडीकर त्यांच्या पाठीशी आहेत.संगमनेर तालुक्यामध्ये अशांतता माजवण्याचा प्रयत्न काही समाज कंटक राजकीय द्वेषातून करत आहेत त्यांच्या विरोधात अम्ही सदैव उभे आहोत असे देखील भोसले यांनी स्पष्ट केले.