भवाडा ग्रामसभेत गदारोळ आणि धुडगूस

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड सुरगाणा तालुक्यातील सर्वात मोठी समजणारी जाणारी ग्रामपंचायत भवाडा येथील ग्रामसभेत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून प्रचंड गदारोळ झाला.त्यामुळे काही तास तणावाचे वातावरण होते.
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीवरून सुरू झालेला गदारोळ हमरीतुमरीसह थेट माईक ओढा ओढीपर्यंत पोहोचला. दरम्यान, ग्रामसभेत गोंधळ निर्माण होताच आलेल्या लाभाथ्यांनी चक्क अंदाचे दोनशे खुच्र्ष्या फोडल्या, तब्बल तीन तास सुरू असलेल्या ग्रामसभेतील या बादाबर अखेर निर्णय लागेना? स्वातंत्र्यदिनी होणारी ग्रामसभा यापुढे एकवेळा ग्रामसभा अजेंडा काढून बरखास्त झालेली असून यावेळेची सलग दिस-यांदा भवाडा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पार पडली.

अध्यक्षस्थानी उपसरपंच रामभाऊ महाले होते. ग्रामविकास अधिकारी मनोहर गायकवाड यांनी अहवाल वाचन केले. १५ व्या वित्त आयोगाच्या योजनेच्या विषयावर चर्चा सुरू झाली असता या योजनेचे संपूर्ण दमर का उपस्थित नाही,असा सवाल संतप्त लाभार्थ्यांनी उपस्थित केला.

यावर लाभार्थी मोहन जाधव म्हणाले की, या १५ व्या वित्त आयोगासाठी आलेला निधी मेला कुठे? त्याचा हिशेब लवकरात लक्कर द्या अन्यथा यापुढे एक रुपया सुद्धा कुठे वापरता येणार नाही. या आर्थिक दोन वर्षांत ग्रामपंचायतीसाठी तीन कोटीहून अधिक खर्च झालेला निधी गेला कुठे?असा संतप्त सवाल ग्रामसभेत मांडला, या ग्रामपंचायतीमध्ये १३ गावे व सह्य पाडे यांचा समावेश आहे.

आजच्या ग्रामसभेत प्रत्येक गावचे नागरिक आपल्या तक्रारी व समस्या मांडण्यासाठी आले होते; परंतु सलग दोन वेळा ग्रामसभा बरखास्त झाल्याने संतप्त महिला व तरुणांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे दप्तर उपलब्ध असते तर ही वेळ आम्हा नागरिकांवर आली नसती व यापुढे पण हे कर्मचारी अशीच केराची टोपली दाखवतील का, असा सवाल उपस्थित केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!