खळी किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील खळी गावचे सुपुत्र सुभेदार सखाराम बाळू लबडे हे नुकतेच भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापुर्ती सोहळा खळी येथे आयोजित केला होता.
याप्रसंगी त्यांचा सत्कार करुन त्यांना भारतीय संविधानाची प्रत,शाल श्रीफळ देऊन श्री.खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष,सिटीलाईन न्यूजचे मंत्रालय प्रतिनिधी किशोर वाघमारे यांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी पंचायत समितीचे मा.सदस्य ॲड.पोपट वाणी समवेत आदर्श शेतकरी बाळासाहेब लबडे हौशीराम लबडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय दिवेकर भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयाचे गजानन वाणी गावातील इतर मान्यवर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.