कोपरगाव प्रतिनिधी स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व,
साहित्यिक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कोपरगांव येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन करण्यात आले.
येथील जाणता राजा प्रतिष्ठाण व आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने.लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त,भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
अण्णाभाऊ साठे यांनी,मजूर, शेतकरी,वंचितांचे प्रश्न समाजासमोर मांडले.त्यांचे “साहित्य हे समाज परिवर्तनाचे साधन आहे” हा विचार पुढे नेला. त्यांची लोकशाहीवरील श्रद्धा,आणि असंवेदनशील व्यवस्थेविरुद्धची आक्रोशाची शैली ही त्यांची वैशिष्ट्यं होती.
त्यांनी मराठी साहित्याच्या प्रवाहाला सामाजिक बांधिलकी दिली.आजच्या तरुण पिढीने अण्णाभाऊंच्या विचारांकडे फक्त स्मरण रूपात नाही,तर कृतीरूपात बघायला हवं. त्यांच्या संघर्षातून शिकून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी लागेल.
या प्रसंगी विवेक कोल्हे पराग संधान भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव,डी.आर.काले, बबलू वाणी, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक गोपी गायकवाड, सोमनाथ मस्के, प्रशांत कडू जितेंद्र रणशूर, विजय आढाव, सिद्धार्थ साठे हाजी फकीर मोहम्मद पैलवान, सतीश रानोडे, विनोद राक्षे, शरद त्रिभुवन रामचंद्र साळुंखे, संतोष नेरे, दिपक गायकवाड, फकीरा चंदनशिव, सुजल चंदनशिव, गोरख देवडे, श्री अविनाश पाठक, अकबर लाला राजेंद्र बागुल, राकेश काले, अल्ताफ कुरेशी, कैलास सोमासे, आकाश वाजे, रवींद्र शेलार, शफीक सय्यद, संतोष साबळे, प्रभूदास पाखरे, विजय चव्हाणके, संजय खरोटे, साहेबराव रोहोम, कैलास नागरे, आबा नरोडे, राहुल आघाडे, अर्जुन मरसाळे, उमेश गोसावी, दीपक पगारे मुकुंद उदावंत, रविंद्र लचुरे, विष्णुपंत गायकवाड, शुभम सोनवणे, अन्सार शेख, सतीश निकम, सिद्धांत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते