१७ वर्षानंतर हिंदुंना न्याय मिळाला

Cityline Media
0
संगमनेरमध्ये जल्लोषाचे वातावरण;पायल ताजणे यांची काँग्रेसवर टीका

संगमनेर विशाल वाकचौरे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाल्याने संगमनेरमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.विशेष एनआयए न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू समाजाच्या सहनशीलतेला न्याय मिळाल्याची भावना शहरभर पसरली असून, संघटनांनी उत्साहात प्रतिक्रिया नोंदवल्या.
या पार्श्वभूमीवर भाजप संगमनेर शहराध्यक्षा सौ.पायल ताजणे यांनी काँग्रेसवर घणाघाती टिका करत म्हटले की "काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांना १७ वर्षे त्रास दिला गेला.मात्र आम्हाला संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास होता – आणि अखेर सत्याचा विजय झाला.

या निकालामुळे साध्वी प्रज्ञा ठाकुर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित, सुभेदार रमेश उपाध्याय,अजय राहिरकर,सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

याच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयोत्सव साजरा केला. “भारत माता की जय”, “हिंदू एकता जिंदाबाद”, “काँग्रेस हाय हाय” अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकण्यात आला.

कार्यक्रमात शिरीष मुळे, सौ. सोनाली बोटवे, ज्ञानेश्वर थोरात यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी हा दिवस हिंदू आत्मगौरवाचा आणि ऐतिहासिक न्यायाचा असल्याचे सांगितले.

संपूर्ण शहरात या निकालामुळे समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!