नागपूर ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे अहिल्यानगरात भव्य स्वागत

Cityline Media
0
अहिल्यानगर ते दौंड अनेक राजकीय दिग्गजांचा प्रवास

नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  ऑनलाईन तर मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय परिवहन मंत्रीनितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे नागपूर - अहिल्यानगर - पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या भव्य क्षणाचे औचित्य साधत, अहिल्यानगर रेल्वे ठाण्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत ढोल - ताश्यांच्या गजरात आणि जयघोषांच्या वातावरणात नागपूर - अहिल्यानगर - पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. 

त्यानंतर,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत अहिल्यानगर ते दौंड असा प्रवास करत वंदे भारत एक्सप्रेसच्या उच्चस्तरीय सोयी,आधुनिक तंत्रज्ञान,आरामदायी आसन व्यवस्था आणि वेगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.प्रवास दरम्यान प्रवाशांनी या सेवेमुळे होणाऱ्या वेळेच्या बचत बद्दल आणि आरामदायी प्रवासाबद्दल उत्साह व्यक्त केलेला आनंद विशेष जाणवला.
ही वंदे भारत सेवा नागपूर (अजनी) - अहिल्यानगर मार्गे - पुणे असा प्रवास करणार असून, नागपूर ते पुणे हे अंतर फक्त १२ तासांत पूर्ण होईल.यामुळे प्रवासाचा वेळ तब्बल ५ तासांनी कमी होणार आहे.विशेष म्हणजे, नागपूर -अहिल्यानगर - पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे.

या नव्या सेवेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोच अधिक सुलभ होणार आहे.त्याचबरोबर व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही नवचैतन्य मिळणार आहे.

नागपूर येथील शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर - पुणे प्रवासाची मोठी मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादातून ही सेवा सुरू झाली आहे. तसेच, नगर - दौंडऐवजी थेट नगर - पुणे रेल्वे मार्ग उभारल्यास अंतर आणि वेळ दोन्ही वाचतील, याबाबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय,छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - पुणे औद्योगिक पट्ट्यासाठी नवीन रेल्वे मार्गांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर येथे मनोगत व्यक्त करताना, मी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उचलल्या जाणाऱ्या अशा ऐतिहासिक पावलांबद्दल पंतप्रधान.नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री.आश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, अहिल्यानगर - पुणे सरळ एक्सप्रेस रेल्वे प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
या स्वागत प्रसंगी, खासदार .निलेश लंके,भाजपचे मा. शहराध्यक्ष.अभय आगरकर, जेष्ठनेते.अंबादास पिसाळ, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष .राजेंद्र गुंड, मा. जिल्हा परिषद सदस्य .प्रवीण घुले, सभापती .काकासाहेब तापकीर,प्रकाश काका शिंदे, डॉ.संदीप काळदाते,.सचिन पोटरे,.गणेश क्षीरसागर.समीर पाटील, पुणे रेल्वे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक.जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता.विकास कुमार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते,पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असल्याची माहिती विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!