दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे बळीराजांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतीत आधुनिक तंत्राचा वापर केला जात असल्यामुळे परिसरामध्ये बैल जोड्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
सकाळपासून ज्यांच्याकडे बैल जोड्या आहेत त्यांनी सकाळीच बैलांना स्नान घातले व नदीकाठच्या व पाट काठच्या प्रवरा नदी पात्रात व प्रवरा उजवा तट कालव्यामध्ये बैलांना स्नान करून घेतले व इतर शेतकऱ्यांनी आपापल्या घरी असलेल्या विहिरीच्या पाण्याने विहिरीजवळ बैलांना स्नान घातले व गाई शेळ्या यांना देखील अंघोळ घालण्यात आली.दुपारनंतर बैलाची सजावट केली.
मोबाईलवर सर्जा राजाचे नाव काहींनी टाकले तर काहींनी गावातील हनुमान मंदिर समाधी बाबा मंदिर शनी मंदिर भगवान बाबा मंदिर आदी मंदिराच्या पुढे आणून बैलाचे पूजन करून देवाच्या नारळ वाढवून पाया पडले या परिसरामध्ये गेल्या २५ वर्षांपूर्वी घरोघरी बैल पोळा मोठ्या उत्साहाने साजरा करत होते.
परंतु आता बैलाचे प्रमाण कमी झाल्याने बैलपोळा थोडा कमी प्रमाणात साजरा झाला जे शेतकरी गावापासून वाडी वस्तीवर राहतात त्यांनी आपापल्या घरी बैलांना सजवून नैवेद्य खाऊ घालून त्यांचे आपल्या घरीच पूजा केली तर काहींनी गावात येऊन असणाऱ्या सर्व मंदिराला प्रदर्शना घालून वाजत गाजत फटाक्याच्या अतिश बाजी करत बैलांना व घोड्यांना नाचवत आपल्या घरी नेले.
खळी परिसरामध्ये आता बैलाचे प्रमाण कमी झाले असून शेतकऱ्यांनी घरोघरी ट्रॅक्टर घेतल्यामुळे येथील पोळा सणावर काहीसा परिणाम जाणवला परंतु काही शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजावट करून गावांमध्ये मिरवत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला याप्रसंगी तंटामुक्ती ग्रामसमिती अध्यक्ष भाऊसाहेब नागरे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे आदर्श शेतकरी सोमनाथ रंगनाथ सानप आदी मान्यवरांच्या हस्ते बैलाची पूजा करत पोळा सण मोठ्या उत्साहाने खळी परिसरामध्ये साजरा करण्यात आला.
