नाशिक दिनकर गायकवाड शिवसेना पक्षप्रमुख उद्धब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दिंडोरी उप तालुकाप्रमुखपदी संतोष भिकाजी भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष भालेराव यांना नियुक्तीचे पत्र संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख,तालुकाप्रमुख पारंग गणार, योगेश बर्डे, जयराम डोखळे यांतरी व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले.संतोष भालेराव यांनी सांगितले की,मी या उपतालुका प्रमुख पदावा पक्ष संघटनेसाठी व समाजसेवेसाठी उपयोग करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिल व सर्वांना बरोबर घेऊन काम करील असे सांगितले.
