कळवणच्या भावडे स्कुल मध्ये गोकुळाष्टमी चैतन्यात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहीहंडीचा उत्साहात साजरा करण्यात आला.
गोकुळाष्टमी निमित्त विद्यालयातील नर्सरी ते सिनियर केजी व दहावी पर्यंतच्या बालगोपाळांनी राधा व कृष्णाचा वेश परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. दहीहंडी उत्सवासाठी विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने दहीहंडीची सजावटकेली. छोट्या गोविंदांनी गाण्याच्या तालाबर गोविंदा रेगोपाळा म्हणत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. प्रसंगी छोट्या गोविंदानी

दहीहंडीच्या गाण्यावर मनमोहक नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद बाटप करण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक व सांस्कृतिक विभागप्रमुख शोभा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य एस. एन. पाटील यांनी छोटचा बालगोपाळांचे कौतुक करून त्यांच्या आनंदात सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे ब सेक्रेटरी मीना देवरे यांनी दहीहंडी निमित्त छोट्या बालगोपाळांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मुदस्सर सय्यद, ययाती जाधव, राजू देवरे, किरण चव्हाण, शिक्षकवृंद, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!