बेलापूर रेल्वे स्टेशनवर सर्वपक्षीय निदर्शने

Cityline Media
0
वंदे भारतला थांबा,साई सुपरफास्ट रोज सुरू करण्याची मागणी

 श्रीरामपूर दिपक कदम येथील बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा,साई सुपरफास्ट पॅसेंजर रोज सुरू करावी तसेच कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात या विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय 
रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनवर निदर्शने करण्यात आली.
यावेळी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एम.पी. पांडे यांना मा.आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, सुभाष त्रिभुवन, गौतम उपाध्ये, रंजीत श्रीगोड राजेंद्र सोनवणे, मुक्तार शहा संतोष डहाळे,सौ.रमा धीवर अमोल साबणे विठ्ठल गोराणे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

प्रसंगी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,नव्याने सुरू झालेली नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनला बेलापूरमध्ये थांबा नसल्यामुळे श्रीरामपूर-बेलापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी थांबा दिल्यास प्रवाशांना सुविधा तर मिळेलच, शिवाय रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल."
त्यांनी पुढे सांगितले की, "साई सुपरफास्ट पॅसेंजर सध्या आठवड्यात फक्त चारच दिवस चालते. ती दररोज सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

या रेल्वेत कायमच प्रवाशांची गर्दी असते, त्यामुळे ती रोज सुरू झाल्यास प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि रेल्वेलाही त्याचा आर्थिक फायदा होईल."
कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्याही तातडीने सुरू कराव्यात, अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अधिकच वाढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 त्याचबरोबर मैसूर–वाराणसी एक्सप्रेस कोपरगावला दीड तास थांबते, पण बेलापूर-श्रीरामपूरला दोन मिनिटांचाही थांबा देत नाही,ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.जर या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेवटी त्रिभुवन यांनी दिला.

प्रसंगी राजू बत्रा बन्सीलाल फेरवानी तेजस गायकवाड अमोल काळे संतोष कांबळे  रॉकी लोंढे योगेश ओझा  भागचंद नवगिरे लहू खंडागळे राजेश वाव्हळ बाळासाहेब ठाकरे  विलास जाधव अल्ताफ  शेख राहुल शहाणे रईस शेख शाहरुख  मन्सुरी मिलिंद धीवर किशोर फाजगे बाळासाहेब जपे बाळासाहेब ढाकणे किशोर नागरे दीपक माखीजा रोशन बत्रा नितीन कापुरे किशोर गाडे सागर कुदळे प्रकाश पाटणी राहुल नाणेकर किशोर ऋषिकेश अवताडे अरुण बोराडे संभाजीराव देवकर नितीन  मासाळ भाऊसाहेब जाधव राकेश थोरात अल्ताफ पोपटिया सुमेध पडवळ
रिपाई भाजप मनसे राष्ट्रवादी शिवसेना मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटना राष्ट्रीय जनसेवा पार्टी भारतीय लहुजी सेना संघटना भिम शक्ती मातंग अस्मिता सेना बहुजन क्रांती सेना गुरुनानक मार्केट व्यापारी वर्गआदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!