-सर्व अंगणवाड्याची झाडाझडती
-शासनाच्या निकृष्ट पोषक आहारामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात.
आश्वी संजय गायकवाड शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून पोषण आहार दिला जात असतो.तर अंगणवाडीला बालकांना तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांना देखील पोषण आहारचा पुरवठा करण्यात येत असतो त्यात शासन पुरविते तो पौष्टिक पोषण आहार फक्त कागदावर दिसतोय प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पाहणीत उघड झाल्याने गावकरी स्तब्ध झाले आहे.गावातील निरागस लहानगे, गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्यावर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत सरपंच सौ.अलका बापुसाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच बाबा भवर, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, सदस्य संजय भोसले,सोपान सोनवणे, सागर भडकवाड,अदिनाथ जाधव, रावसाहेब जेडगुले यांनी गावातील सर्व पाचही अंगणवाडी केंद्रांची पाहणी केली.
यावेळी मुलांची उपस्थिती,आरोग्य तपासणी,सेविका–मदतनीसांची उपस्थिती तसेच पोषण आहारातील धान्याची प्रत्यक्ष तपासणी केली असता हलक्या प्रतीचा,निकृष्ठ दर्जाचा आहार मुलांना पुरवला जात असल्याचे झाडाझडती मुळे स्पष्ट झाले.
झालेल्या या प्रकारामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना धारेवर धरत स्पष्ट सवाल केला की लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू राहिला तर ग्रामपंचायत गप्प बसणार नाही.शासन निकृष्ट आहार पुरवत राहिल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली आहे.
यावेळी ग्रामपंचायतीने ठोस सूचना केल्या की येणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक बॅच तपासूनच आपल्याकडून स्विकारण्यात यावी पुरवठा थेट ग्रामपंचायतीच्या देखरेखी खाली हस्तांतरीत करावा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई व गुन्हे दाखल करावेत गावकऱ्यांमध्ये या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असून शासनाच्या या उदासीन कारभाराविरोधात तसेच निकृष्ट दर्जाची आहारा विरोधात मोठे जनआंदोलन लवकरच उभारले जाणार असल्याचे उपसरपंच बाबा भवर यांनी सांगितले आहे.
