कौलाघात शिक्षण संस्थांनी स्पर्धेचे आव्हान स्विकारावे कारण माहिती हेच भांडवल-मंत्री ‌भुजबळ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड बदलत्या काळानुसार जग बदलत आहे.तंत्रज्ञानही दिवसेंदिवस बदलत असून ते आपल्या जीवनात आवश्यक झाले आहे. माहिती हेच मोठे भांडवल झाले आहे. आपल्या शिक्षण संस्थांना स्पर्धेचे आव्हान स्वीकारावेच लागेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बनकर होते.यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले,महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्था या राज्याचे भूषण आहेत.या संस्थांना मोठा इतिहास आहे. या शैक्षणिक संस्था उभ्या करताना संस्थापकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आदी संस्थांची उदाहरणेही त्यांनी भाषणात दिली.कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी

रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज ओळखून त्या दृष्टीने संस्था उभी केली. या शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक आणि इतर कर्मचारीही महत्वाचे आहेत. मी ज्यावेळी नाशिक येथे संस्थेचे काम सुरू केले तेव्हा शिक्षक मिळणे हे दुरापास्त होते. अनेक लोक नाशिकला येण्यास धजावत नसत. दिवसेंदिवस नाशिकची प्रगती होत गेली. पायाभूत सुविधा उभ्या राहिल्याने नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढले आहे.यामुळे अनेक लोक आता नाशिकला पसंती देऊ लागल्या आहेत. टुरिझम हा नाशिकचा मुख्य पाया आहे. त्यादृष्टीनेही आपण प्रयत्न करायला हवेत. शिक्षण क्षेत्रातही स्पर्धा वाढले

असल्याने त्या दृष्टीने आपण तयार असायला हवे. असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात दिलीप बनकर म्हणाले भुजबळ यांचा राज्यात दबदबा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रश्न सुटतात. अनेक विकासाची कामे त्यांच्यामुळे मार्गी लागले आहेत. शेती, पाणी, आरोग्य यांचे प्रश्न ही सोडवत असतात. राज्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनही त्यांच्या शब्दाला किंमत असल्याचे बनकर यांनी सांगितले.

यावेळी छगन भुजबळ यांचा संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दिलीप बनकर यांचाही अजिंक्य वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास वामन खोसकर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नाना महाले, बी. के. जगताप, भास्कर जाधव, विलास टरले, धनंजय होळकर, सुरेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.के.वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नांदुरकर यांनी केले. भुजबळ यांचा परिचय बी. व्ही.कर्डिले यांनी करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास क. का.शिक्षण संस्थेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!