ठाणे प्रतिनिधी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ॲड.किरण चन्ने यांच्यावर जात्यांध मानसिकतेतून भ्याड हल्ला करण्यात आला हा हल्ला निषेधार्थ असुन तो एका व्यक्ती नसून संपूर्ण आंबेडकर समुदायावर आहे याचा निषेध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शिव -फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेले सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी नुकतेच एकत्र आले होते.
कल्याण येथील अत्रे हॉल येथे शाम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते येथे या सभेत ॲड. किरण चन्ने यांच्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला तसेच, या घटनेचा धिक्कार करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांविरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी पुढील कृती आराखड्यावर विचारमंथन करण्यात आले. या अन्यायाविरुद्ध उभे राहून, योग्य न्याय मिळेपर्यंत संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
