वणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी चैतन्यात

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड 'हाथी घोडा पालखी,जय कन्हैया लाल की ''नंद घर आनंद भयो, जय कन्हैयालाल की च्या घोषणेत दिंडोरी तालुक्यातील वणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व गोपाळकाला उत्सव दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील भगवती कॉलनीतील राधा-कृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त संगीतमय श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील सार्वेकर येथील श्री कृष्णकथा प्रवचनकार भागवताचार्य सुरेश महाराज शास्त्री यांनी श्रीकृष्ण कथेचे निरुपण केले. दररोज दुपारी २ ते ६ वाजेपर्क श्रीकृष्ण कथेचे श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सुरेश महाराज शास्त्री यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथा सांगून मध्यरात्री १२ वाजता

फुलमाळा, विविध रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मातांनी आपल्या बालकास श्रीकृष्णाची वेशभूषा व साजेचा साजशृंगार जन्मोत्सवात सहभागी करीत झाले होते, यावेळी पाळणा व गवळणी गायन करून उपस्थित महिला भाविकांनी ठेका धरला. त्यानंतर श्रीकृष्णाची आरती संपन्न झाली.तसेच शनिबारी सुरेश महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर महाआरती व मान्यवरांच संत पूजन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून सप्ताहाची सांगता झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी केली होती. राधा कृष्ण महिला मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ यांनी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!