नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री गोपालकृष्ण देवराई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नाशिक येथील नवले परिवाराकडून त्यांना भरीव मदत केली आहे.
येथील मूळ रहिवासी व सध्या नाशिकला वास्तव्यास असणारे व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ नवले यांनी आई दिवंगत काशीबाई रंगनाथ नवले यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणानिमित्त सह्याद्री गोपालकृष्ण देवराईचे
लोकोपयोगी काम बघूनन देवराई व पाण्याच्या तळ्याच्या भरावाला जोडणारा लोखंडी पूल बनवण्यासाठी एकसष्ट हजार एकशे अकरा रुपयेचा धनादेश श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात देवराई सदस्यांकडे सुपूर्द केला.याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, जालिंदर गोवर्धन,बाळासाहेब नवले,भारती नवले, वैभव नवले,निकिता नवले आदी उपस्थित होते.
