विविध फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अवनखेड मध्ये युवादिन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील परनोंड रिकार्ड इंडिया फाउंडेशन आणि युथ ड्रमर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आंतरराष्ट्रीय युवादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक प्लॉट एचआर प्रमुख संदीप फुके, बाह्य व्यवहार विभागप्रमुखशरद नागरे,बलखेडचे सरपंच विनायक शिंदे, सहाय्यक प्रा.विश्वजीत डी. कदम,युथ ड्रीमर्स फाउंडेशनचे संस्थापक सौरभ मेहरोत्रा, मुख्य अभियंता आनंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी परनॉर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती कार्यक्रमामध्ये योगदान देणा-या स्वयंसेवकांचे व शिष्यवृत्तीचे माजी विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रा.

विश्वजीत कदम यांनी युवकांसाठी भविष्यातील करिअर आणि कौशल्ये या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी करिअर निवडीतील दिशादर्शन, डिजिटल व सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व, उद्योग क्षेत्रातील बदल आणि आयुष्यभर शिक्षणाची गरज यावर भर दिला. संदीप फुके यांनी आपल्या उद्योगातील अनुभवातून रोजगार व उद्योजकतेतील फरक, हायब्रिड कौशल्यांचे महत्त्व, नेतृत्व व प्रकल्प व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांशी संबाद साधला. शरद नागरे यांनी स्वतः चा व्यावसायिक प्रवास कथन करत

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक संसाधनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले, तसेच परनाँड रिकार्ड इंडिया आणि युथ ड्रीमर्स फाउंडेशनमधील भागीदारी ग्रामीण भागातील उच्ब शिक्षणासाठी एक महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी नमूद केले. परनॉर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती लाभार्थी कु.कोमल बाळके हिने याप्रसंगी आपली यशोगाथा मांडली.कार्यक्रमासाठी सरपंच नरेंद्र जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पिंगळ आणि स्वप्नाली पिंगळ यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!