संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील जोर्वे येथील आंबेडकर नगर मध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त गेले वीस वर्षे धम्म सेवा संघ,बालसंस्कार केंद्र व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिन व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे.यंदाही लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गायक प्रवीण कुमार गायकवाड यांचा भीमशक्ती गायन पार्टीचा कार्यक्रम घेऊन अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
यावेळी धम्म सेवा प्रसारक संघाचे अध्यक्ष रावसाहेब यादव, धम्म सेवा संघाचे प्रचारक आणि प्रसारक सचिन मोकळ यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर भाषण स्पर्धा आयोजित केली होती.
प्रथम क्रमांक आराध्या जीवन यादव.तर द्वितीय क्रमांक प्रणिती संजय बलसाने आणि तृतीय क्रमांक कुमारी समृद्धी रावसाहेब यादव या विद्यार्थ्यांनी पटकाविला तिन्ही विजेत्यांना प्रमोद इंगळे यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले.
यावेळी अभिवादन सभेसाठी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव,बहुजन प्रतिष्ठानचे प्रमोद इंगळे,सुभाष गायकवाड, बाळासाहेब चव्हाण,गुलाब गायकवाड, रामदास बोराडे, विजय यादव,गोकुळ रुपवते, सागर यादव, नामदेव गायकवाड, जीवन यादव, संजय बलसाने, गणेश बाबासाहेब चव्हाण त्याचप्रमाणे महिला अलका चव्हाण,बबई गायकवाड, मायाबाई रुपवते,सीताबाई यादव, नेहाबाई बलसाने, कमल वाघमारे,सुशीला बोराडे, रुपाली गायकवाड, आधी महिला व पुरुष मोठ्या संख्येने या अभिवादन सभेसाठी उपस्थित होते.
धम्मप्रसारक सेवा संघ व आंबेडकर जयंतीसाठी अल्प दरात/ कधीकाळी कोणतही मानधन न घेता मंडप साउंड सिस्टम लाइटिंगची व्यवस्था करणारे आंबेडकरी विचारांचे पाईक रावसाहेब गुंजाळ यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब यादव तर सूत्रसंचालन सचिन मोकळे यांनी केले
सर्व उपस्थितांचे आभार संजय बलसाने यांनी मानले.