नाशिक मध्ये विविध ठिकाणी रक्षाबंधनाचा सामुहिक कार्यक्रम साजरा

Cityline Media
0
नाशिक  दिनकर गायकवाड रक्षाबंधनाचे औचित्य साधून नाशिक मध्ये विविध ठिकाणी रक्षाबंधनाचा सामुहिक कार्क्रम उत्साहात पार पडला.
यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालय येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या (इको क्लब) विद्यार्थिनींनी पंचवटी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना टाकाऊतून टिकाऊ स्वतः तयार केलेल्या राख्या बांधत सन्मान केला.राखी बांधताना 'आपण आमचे खरे रक्षक आहात',असा आदरभाव देखील व्यक्त केला.

प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक केले.रक्षाबंधन हे एकमेकांच्या रक्षणाचे वचन असते, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. कुठलीही समस्या उद्भवल्यास संपर्क साधा,आम्ही तत्पर आहोत,असे सांगितले.या वेळी पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव, सचिन चव्हाण,पोलिस अंमलदार मुश्रीफ शेख,पोलिस हवालदार अनिल गुंबाडे, शरद ठाकरे, आस्तिक गायकवाड, राजेश महाले, श्रीकांत साळवे, चितळकर, रोहिणी उगले, रोहिणी सवंद्रे, रोहिणी साबळे, स्वाती फड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक किशोर झोटिंग आणि पर्यवेक्षिका शुभदा टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यासाठी क्रीडा शिक्षक अरुण जाधव, प्रदीपसिंग पाटील आणि मनीषा पवार यांनी कामकाज पाहिले. उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी केवळ एक राखी बांधून औपचारिकता पार पाडली
नाही, तर त्यांनी रक्षण करणाऱ्या खऱ्या रक्षकांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश दिला. राख्यांचे टाकाऊतून टिकाऊ निर्मिती ही पर्यावरण संवर्धनाचे भान ठेवणारी जाणीवही ठरली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेचे, देशप्रेमाचे आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!