दैनिक पुण्यनगरीच्या वर्धापन दिन विशेषांसाठी मा.खा.डॉ.सुजय विखे पा.यांची पत्रकार विकास अंत्रे यांनी घेतलेली मुलाखत दैनिक पुण्यनगरीच्या दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अंकात प्रकाशित होणार आपला अंक आजच राखून ठेवा..
-ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी,भेटीत स्पष्टता होती मोठी,त्या एका भेटीत चैतन्य होते
कितीदा आलो,गेलो,जमलो पण मिश्किल पणातुन मन सजग राहिले.
सन २०१३ ची आठवण. दैनिक पुण्यनगरी मध्ये व्यवस्थापनाच्या मदतीने मी आयडॉल नगरचे..हे सदर सुरू केले होते.विविध क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या नगरी मातीतील तरुणांची जडणघडण आणि धडपड मांडली जावी,असा या सदराचा उद्देश होता.सदर किती शब्दाची असावे.वर्तमान पत्राच्या कुठल्या पानावर असावे,त्याचा ले-आउट आणि ग्राफिक कसा?असावा.. यावर पुण्यनगरीचे संस्थापक- संपादक आदरणीय दिवंगत मुरलीधर अनंता शिंगोटे तथा बाबा यांनी तात्काळ काही सूचना केल्या.लागोलाच त्याची अंमलबजावणी करून लोकांचे वैचारिक समाधान करण्यासाठी सदर सुरू करण्याचे ठरले.तेव्हा पहिली मुलाखत कुणाची घेऊन प्रकाशित करावी यावर आमच्या संपादकीय मंडळात खल झाला.चर्चेअंती एक नाव समोर तरळले ते होते नगर दक्षिणेचे मा. खासदार डॉ.सुजय विखे पा. यांचे.तेव्हा डॉ.विखे नुकतेच आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मध्ये सराव करत होते.वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे काम शांतपणे सुरू होते. मेंदू तज्ञ म्हणून अनेक प्रिय शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आजही अनेक मेंदू विकाराने पिडीत असलेले रुग्ण त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात.त्यांच्या जडण-घडणी विषयी जाणून घेण्याची तरुणाईचं काय जिल्ह्याला देखील उत्सुकता होती परंतु डॉ.सुजय विखेंविषयी किंवा त्यांच्या कामाविषयी माध्यमकर्मींना देखील फारशी माहिती नव्हती.त्यामुळे वाचक, प्रेक्षकांपर्यंत ती पोहचणार कशी?यासाठी दैनिक पुण्यनगरीचा प्रयत्न सुरू होता.
या सदराच्या मुलाखतीसाठी डॉ.सुजय विखे यांची मी भेट घेतली.बालपण,शिक्षण,माणूस म्हणून जडणघडण,ते निरो सर्जन होण्यापर्यंतचा प्रवास अशा सर्वच प्रश्नांना डॉ.विखेंनी मनमोकळे आणि दिलखुलास उत्तरे दिली.
त्यानंतर आठवड्याच्या येणाऱ्या रविवारी आयडॉल नगरचे सदराचा पहिला भाग आणि डॉ. सुजय विखे यांची माध्यमातून पहिली मुलाखत प्रकाशित झाली.मला वाचकांचे फोन आले तर दैनिक पुण्यनगरीचा दुरध्वनी खणखणत होता कुणाला त्यांचे वैद्यकीय काम आवडले होते तर कुणाला तरुणाई बद्दलचे विचार.सायंकाळी डॉ.सुजय विखेंचा देखील फोन आला. त्यांनाही अनेक वाचक, हितचिंतकांनी फोन करून मुलाखत आवडल्याचे सांगितले.पुण्यनगरीच्या रीडरशिपची 'व्हरायटी ऑफ पीपल' ही ताकद त्यांनी पहिल्यांदा अनुभवली.
त्यानंतर सेवाभावी कार्य,पक्ष संघटन,राजकारण, दक्षिणेतून खासदार,पुन्हा दक्षिणेतून पराभव असा सुजय विखेंचा नंतरचा प्रवास आपल्या सर्वांसमोर आहे. यंदा दैनिक पुण्यनगरी २५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.सध्या चमु पुण्यनगरी वर्धापन दिनाचा अंक परिपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या विशेकांसाठी नुकतीच डॉ.सुजय विखे यांची भेट घेतली.
पुण्यनगरीचे सहाय्यक व्यवस्थापक जीवन गवळे, राहाता तालुका प्रतिनिधी दिलीप खरात हे बरोबर होते.एक तास पुन्हा मुलाखत रंगली. "मी खरं बोलतो,परखड बोलतो.अनेकांना ते आवडत नाही.पण जे सत्य आहे, ते जनतेच्या हिताचा असतं.म्हणून बोलतो". या वाक्याच्या सुराने चालू झालेल्या मुलाखतीत जिल्ह्याचा पाणी प्रश्न,प्रवरेचे पाणी महायुतीचे राजकारण,हिंदुत्व,जिल्हा विभाजन,दक्षिणेतील पराभव अशा अनेक प्रश्नावर डॉ.सुजय विखेंनी रोखठोक उत्तरे दिली.मुलाखत संपली.आम्ही माघारी निघालो.तेव्हा डॉ.सुजय विखे यांनी मी घेतलेल्या त्यांच्या पहिल्या मुलाखतीच्या आठवणीला उजाळा दिला.जिथे स्नेह,निखळ मैत्रीचे ऋणानुबंध असतात,तिथे जगण्याच्या धबाडक्यातही आठवण,आपुलकीचे चार क्षण जाणीवपूर्वक जपले जातात.याचीच प्रचिती मा. खासदार डॉ.विखे यांनी दिली आणि प्रारंभबिंदू हाच अत्युच्चबिंदू आहे असे वाटून गेले