नाशिक दिनकर गायकवाड नाशिक-पेठ रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी एकत्र येत एल्गार केला असून येत्या २७ रोजी कोटंबी घाटात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक- पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ चा दर्जा मिळाला. त्यामुळे आंतरराज्य मालवाहतूक करणारे अवजड बाहनास हा मार्ग कायदेशिर झाला.अवजड व अवाढव्य यंत्रसामुग्रीची वाहतूक करणारी वाहने कायदेशिर परवानगी घेऊन येत असल्याने या मार्गावरील आरटीओ चेक नाक्यावर अशा वाहनांना प्रतिबंध करणे शक्य नाही.अशी बाहने पुढे जाऊन कोटेखी घाट, साकळघाट येथील अरुंद वळणावर अडकून पडत आहे. तास न तास बाहतूक कोंडी करीत असतात, या बाबी सातत्याने घडत असतांनाही नियंत्रक कणेकडून त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सत्याचे दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातातील मृत्युसाठी संबंधीतांबर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सर्व पक्षभेद विसरुन कोर्टबी घाटात दि. २७ ऑगष्ट रोजी रास्ता रोको करण्याचे निवेदन तहसिलदार पेठ व पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. यावेळी किरण भुसारे, लहू शिंदे, पंकज पाटील, श्याम गावीत, सुरेश खंबाईत, गणपत चौधरी, मनोहर चौधरी आदी उपस्थित होते.
