दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील निवाणे येथे दरीतील चिंबविहिर परिसरातील भागवत कथा सप्ताह सोमवार दि. १ सप्टेंबर पासून सुरवात होणार आहे. सप्ताह काळात दररोज सकाळी ८ते १२ ग्रंथ वाचन दुपारी १२ ते २ भोजन विश्रांती दुपारी परत ग्रंथ बाचन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ९ते११ कीर्तन, भजन व हरिजागरण तर पहाटे काकड आरती आदी कार्यक्रम होणार आहे. नाना महाराज तीळवरकर यांच्या हस्ते कलश स्थापनेने व पुरोहित मनोज चंद्रात्रे यांच्या मंत्र घोषात होणार आहे.
बुलढाणा येथील पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रथम किर्तनाने सुरवात होत आहे. मंगळवार दि २ रोजी कांचन शेळके (यवतमाळ),बुधवार दि.३ रोजी संदीप महाराज पैठणकर, गुरुवार दिनांक ४ रोजी विकास महाराज देवडे.. शुक्रवार दिनांक ५ रोजी तुकाराम महाराज जेजुरकर
शनिवार दिनांक ६ रोजी माऊली महाराज आळंदी, रविवार दि. ७ रोजी हेमंत महाराज दह्याने आदींचे कीर्तन होणार आहे. रविवार दि. ७ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हेमंत महाराज यांचे प्रवचन दुपारी ११ ते २ महाप्रसाद, २ ते ४ पालखी मिरवणूक व ४ ते ६ या वेळेत नाना महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भजनी मंडळ, ग्रामस्थांनी केले आहे.
