दोन दिवसांच्या धुंवाधार पावसाने पेठ मधील शेतकऱ्यांची ‌प्रतिक्षा पुर्ण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड पेठ तालुक्यात खरीपाच्या पिकासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा अखेर दोन दिवसाच्या पावसाच्या धुंवाधार आगमनाने पूर्ण झाली.
चिखल उते मधील रोप तयार झाले तर त्यासाठी आवश्यक पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे मात्र सावट निर्माण झाले होते. दोन दिवसांपासून तालुक्यात खरीपास जीवनदान देणारा पाऊस परतल्याने किमान सद्यातरी संकट दूर झाल्याचे जाणवत आहे.

तालुक्यातील खरीपाचे भात, वरई,नागली यांची लावणीची कामे जवळपास पुर्णत्वास गेलेली आहे. मात्र संततधार पावसाने जनजीवन

विस्कळीत झाले आहे.शहराकडे येणारे रस्त्यावरील ओढे, नाले,ओहोळ ओसंडून वाहत होते त्यामुळे पावसातून प्रवास करण्याचा उगाचच धोका पत्करण्यापेक्षा गावीच राहण्यास पसंती दिली. त्यामुळे बाजारपेठामध्ये सामसुम होती.

लागल्या तर काही ठिकाणा पावसान उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी विहिरीचे पाणी पिकांना देणे पसंत केले. मात्र काही शेतकरी पाऊस पडेल, या आशेमुळे पिकांना पाणी देत नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांपुढे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सलग २० ते २४ तास परिसरात संततधार सुरू राहिल्याने पिकांना जीवदान मिळाले. याशिवाय भीजपावसामुळे विहिरीतील पाणीपातळीमध्ये वाढ होण्यास मदत मिळणार असून त्याचा परिणाम रब्बी हंगामावर अनुकूल होणार आहे. संततधारमुळे व बाणगंगा नदीच्या उगमस्थानात चांगला पाऊस झाल्यामुळे बाणगंगा नदीपात्रात पाण्याची मोठी वाढ झाली. हवामान खात्याने अजूनही पाक्साची शक्यता वर्तविली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!