सातारा सिटीलाईन न्यूज नेटवर्क माण तालुक्यातील दहिवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे "श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था"असे नामकरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या नवीन नाव फलकाचे अनावरण करून नामांतर झाल्याचे घोषित केले.
याप्रसंगी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थानचे विश्वस्त जयंत परांजपे,.जिल्हा परिषद सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे (आबा),भाजपा कार्यकारणी सदस्य डॉ.संदीप दादा पोळ, सभापती अतुल जाधव, दहिवडी नगरीच्या नगराध्यक्ष सौ. नीलम अतुल जाधव,
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कायदा आघाडी अध्यक्ष ॲड.दत्तात्रय हांगे ,दहिवडी नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप घारगे,भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते धीरज दवे,युवानेते सिद्धार्थ गुंडगे, म्हसवडचे मा. नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ, विठ्ठलबापू भोसले,
दहिवडीचे मा.नगराध्यक्ष सतीश जाधव, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय देशमाने,संदीप जाधव, संजयशेठ शितोळे,आयटीआय समिती दहिवडीचे सदस्य पत्रकार राजेश इनामदार यांसह श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.