श्रीरामपूर दिपक कदम सीमेवर राहून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आदरभाव व्यक्त करत श्रीरामपूर येथील बहीण कलावती देशमुख या दरवर्षी जवानांना राख्या पाठवतात. यंदा त्यांनी स्वतःतयार केलेल्या तब्बल श्रीरामपूर प्रधान डाकघर येथून ३००० तर अहिल्यानगर डाकघर येथून ९००० हजार तर उर्वरित ४ हजार राख्या एम आय आर सी राख्या अशा एकूण १६ हजार राख्या पोस्टामार्फत जवानांना पाठवण्यात आल्या.
यावेळी श्रीरामपूर व अहिल्यानगर येथील पोस्ट कार्यालयात हा राख्या पाठवण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, विभागीय पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे,पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष चांगदेव मस्के, श्रीरामपूर प्रधान डाक घरचे प्रमुख श्री.जनवडे डाकघरचे डाक मास्तर राजन पवार, डाक कार्यालयाचे आय.डी.सी. विजय कोल्हे,बोरावके महाविद्यालयाचे सुनील देवकर एनसीसी अधिकारी ॲड शुभम केनेकर, भूषण शिंदे, हर्षल शिंदे, दीप देशमुख देशमुख निलेश बागुल दीपक शेळके,संदीप बोकफोडे राजू शेळके,अमोल शेळके, उपस्थित होते तर अहिल्यानगरयेथे प्रधान डाकघरचे प्रवर अधीक्षक विकास पालवे, भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, प्रधान डाकघरचे पोस्टमास्तर हेमंत खडकीकर उपस्थित होते.
राख्या तयार करणाऱ्या कलावती देशमुख, श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयाचे सुभेदार सुनील देवकर, ॲड.शुभम केनेकर याप्रसंगी उपस्थिती होती.यावेळी प्रवर अधीक्षक पालवे म्हणाले, डाक तर्फेही 'दिल से सरहद तक' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे राख्या जवानांना पाठविण्यात येत आहेत.
कलावती देशमुख यांनी स्वकष्ट आणि स्वखर्चातून राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती बंधुभाव स्थापित केला आहे. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे म्हणाले, पोस्टाचे मनात स्थिरावलेले नाते एक अतूट नाते आहे. बालपणी आलेल्या पत्रांचा संग्रह आजही माझ्याकडे असून तो प्रेरणादायी आहे. राख्या तयार करून त्या पाठवण्याचे
कलावती देशमुख यांचे काम कौतुकास्पद आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी कलावती देशमुख म्हणाल्या, राख्या तयार करून जवानांना पाठवण्याचे काम पाच वर्षापासून करत आहे. देशाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याची, सेवा करण्याची ही अनोखी संघी माझ्यासाठी मोलाची आहे. याच भावनेतून वर्षभर राख्या तयार करते यावर्षी १६ हजार राख्या तयार केल्या असून, त्या पोस्टाकडे सुपुर्द करताना समाधान वाटते आहे.
या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय शुभम केनेकर यांनी करून दिला.सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत कुमार,सुनील देवकर यांचे मार्गदर्शन लाभले तर या उपक्रमात त्यांचे विद्यार्थी भूषण शिंदे, हर्षल शिंदे, दीप देशमुख यांनी वर्षभर त्यांचे विद्यार्थी भूषण शिंदे हर्षल शिंदे व चिरंजीव दीप देशमुख यांनी कलावती देशमुख यांच्यासोबत वर्षभर राख्या तयार करण्यासाठी मदत केली. यावेळी कलावंती देशमुख यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे अनेकांनी कौतुक करण्यात आले.