अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकाचा विकास आराखडा तयार-मंत्री भुजबळ

Cityline Media
0
येवला रेल्वे स्थानक । पाहणी व सूचना

येवला प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून येवला रेल्वे स्थानकाच्या प्रश्नांबाबत आपला केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यानुसार आता 'अमृत भारत स्टेशन' योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्यात असून या आराखड्यातील कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी दरम्यान केले यावेळी त्यांनी अनेक सुचना केल्या.
नुकतेच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत त्यांनी येवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना पुढीलप्रमाणे आवश्यक त्या सूचना केल्या.

- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
-अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती देऊन काम सुरू करण्यात यावी.

- रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ चे काम, प्लॅटफॉर्म क्र. १ ची लांबी वाढविण्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावे.

- येवला रेल्वे स्थानकावर खतांचे रॅक उतरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

-याबाबत गुड्स शेड, प्लॅटफॉर्मवरील शेड्स, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, शेड यांची कामे पूर्ण करण्यात यावी.
- रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना शहराला वळसा घालून यावे लागते. त्यामुळे येवला-शिवूर राष्ट्रीय महामार्ग रेल्वे उड्डाणपुलापासून रेल्वे मालधक्का समांतर रस्ता तयार करण्यात यावा.

तसेच येवला शहराचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.त्या दृष्टीने या ठिकाणी अधिक गाड्यांना थांबा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यासाठी पहिल्यांदा रेल्वे प्रशासनाने सर्व पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्यात याव्यात,अशा सूचना यावेळी दिल्या.

यावेळी मध्य रेल्वेचे सिनियर इंजिनियर देवेंद्र, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, स्टेशन प्रबंधक योगेश कोल्हे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, राजेश भांडगे, मकरंद सोनवणे, अविनाश कुक्कर,प्रवीण पहिलवान, सुभाष गांगुर्डे, विनोद ठोंबरे, भाऊसाहेब धनवटे, देविदास निकम, भूषण लाघवे, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विशाल परदेशी, आदित्य कानडे, गणेश गवळी, राकेश कुंभारे, यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!