नामदार रामदास आठवले यांच्या निधीतून पवळा सामाजिक सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव आद्य नृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांचे
कलाक्षेत्रातील प्रथम प्रर्दापण या धाडसी निर्णयामुळे कलाक्षेत्रात इतिहास घडला.कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाज सेवा करणाऱ्या त्या महिला आहेत.कौलाघात महान व्यक्ती लुप्त होतात मात्र त्यांची कला त्यांना शाश्वत सन्मान मिळवून देतात आणि इतरांना प्रेरणादायी ठरतात अनेक दिवसांपासून कला क्षेत्रात एका व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्या पवळा भालेराव व्यवस्थेने झाकोळून टाकल्या होत्या परंतु भालेराव कुटुंबीय व हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळे आज संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे त्यांच्या जन्मगावी त्यांच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन नुकतेच झाले.
कला सम्राज्ञी पवळा कला मंच या संस्थेच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ मोठ्या धिराने लढा दिला.त्यामुळे आता कुठे योग आल्याने महाराष्ट्रातील कलाप्रेमी गावकरी सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभले आहे. तसेच हिवरगाव पावसा येथील सामाजिक सलोखा एकोपा कौतुकास्पद आहे येथे सर्व समाज एक दिलाने सामाजिक कार्यक्रमास सहभाग घेतात हे एक समाजापुढे आदर्श उदाहरण आहे.
यावेळी कला सम्राज्ञी पवळा कला मंच संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव म्हणाले की
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून पवळा भालेराव हिवरगावकर सामाजिक
सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे पवळा यांच्या जन्म गावी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खासदार निधीतून पवळा हिवरगावकर सामाजिक सभागृहासाठी वीस लाख रुपये निधी दिला आहे.
पवळा हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ सुंदर भव्य सामाजिक सभागृहाचे निर्माण होत आहे.
हिवरगाव पावसा ही कलावंतांची भुमी आहे.पवळा यांच्या कलेचा समृद्ध वारसा त्यांचे भाचे लहुजी भालेराव यांनी पुढे चालवला.
तसेच येथे कला वाढली व राज्यभरात तिचा प्रचार प्रसार झाला.पूर्वीच्या काळी काही लोककला प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नव्हते.पवळा या उपजत प्रतिभावंत कलाकार होत्या.
हिवरगाव पावसा ही तमाशा
पंढरी म्हणून ओळख निर्माण करण्याचा कार्य कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या माध्यमातून पुढील काळात केले जाणार आहे.त्यांच्या प्रलंबित राष्ट्रीय स्मारकामध्ये सर्वधर्म समभाव जपला जाणार आहे.लोककलेसह वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळाच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. काळाच्या ओघात नामचंद पवळा यांचे नाव मागे पडले होते ते आता प्रकाश झोतात येणार आहे.तसेच हिवरगाव पावसा ग्रामस्थांचे आत्तापर्यंत मोठे सहकार्य मिळाले आहे.यापुढे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रसंगी"लालाय्लू" या बृहद कादंबरीचे लेखक प्रा.संतोष भालेराव यांनी आपल्या भाषणात म्हटले की सामाजिक सभागृह अनेक ठिकाणी आहेत परंतु त्या कलावंताच्या नावे सामाजिक सभागृह निर्मिती होणे दुर्मिळ घटना आहे.नामचंद पवळा यांचे महाराष्ट्राच्या कला संस्कृती क्षेत्रात मोठे योगदान आहे त्यांचे कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णपान आहे. त्यांच्या जन्म गावी त्यांचे नावे सामाजिक सभागृहाचे निर्मिती होणे एक आनंददायी घटना आहे हे सर्व नामदार रामदास आठवले यांच्यामुळे शक्य होणार आहे.नामदार आठवले हे रसिक असून त्यांना कलाकारांची चांगली जाण आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवरगाव पावसा ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष गडाख आपल्या भाषणात म्हणाले की पवळा सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा अत्यंत आनंददायी सुवर्णक्षण आहे. कारण संस्थेचे प्रेरणास्थान पवळा यांचे नातभाचे चांगदेव लहुजी भालेराव हे माझे शालेय वर्गमित्र होय.ते रात्र शाळेत पवळा यांचा संपूर्ण जीवनपट सांगत असे.आज या सामाजिक सभागृह भूमिपूजन प्रसंगी त्यांचा जीवनपट डोळ्यासमोर उभे राहत आहे.त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी तमाशा लोककला सादर केली.हिवरगाव पावसाचे नाव मोठे केले याचा संपूर्ण गावाला अभिमान आहे.
सामाजिक सभागृहाचे दर्जेदार काम होण्यासाठी कटाक्षाने लक्ष राहील तसेच ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२४-२५ योजने अंतर्गत नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या खासदार निधीतून पवळा हिवरगावकर सामाजिक सभागृह भूमिपूजन सोहळ्यास वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते,'लालाय्लू' या बृहद कादंबरीचे लेखक प्रा.संतोष भालेराव,संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव सरपंच सुभाष गडाख,भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे रिपाइंचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके,शहराध्यक्ष कैलास कासार,शिवसेना तालुका उपप्रमुख भीमाशंकर पावसे,
वृक्षमित्र गणपत पावसे,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे, सोसायटीचे संचालक अशोक भालेराव, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे इंजिनीयर बाबुराव भालेराव,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,ग्रामसेवक हरिष गडाख,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,प्रा.बाबुराव पावसे,केशव दवंगे,हरिश्चंद्र भालेराव संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.रंजना भालेराव देवगड देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,अनिल गडाख,संतोष पावसे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी केले.तसेच धम्मविधी बौद्धाचार्य गौतम भालेराव गुरुजी आणि बौद्धाचार्य रामदास भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब भालेराव,सोमनाथ भालेराव, यादव भालेराव,बच्चन भालेराव,
रोहिणी भालेराव,संजय भालेराव, इंजिनीयर सागर गुंजाळ,अंजना भालेराव,राजेंद्र दारोळे,
