बिहार सिटीलाईन मिडिया नेटवर्क फणा काढलेला नाग साप पाहिल्यावर भल्या भल्यांना घाम फुटतो.पण बिहारच्या बेतिया येथून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. येथे एक वर्ष वय असलेल्या बाळाने एका विषारी कोब्राचा चावा घेतला आणि यामुळे कोब्राचा जागेवरच मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सापाला चावल्यानंतर काही तासांनी बाळ देखील बेशुद्ध झाल्याचं समोर आलं ही घटना बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील मोहच्छी बनकटवा गावातील असल्याचे सांगितले जात आहे. हा बाळाला बेशुद्ध अवस्थेत मझौलिया पीएतसी येथे दाखल करण्यात आले.
येथे प्रथमोपचार घेतल्यानंतर त्याला बेतिया येथील सरकारी मेजिकल कॉलेज आणि रुग्णालय (जीएससीएच) येथे रेफर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील साह यांचा एक वर्षाचा मुलगा गोविंद हा शुक्रवारी दुपारी त्याच्या घरात खेळत होता. त्याची आजी मातेश्वरी देवी यांनी सांगितले की खेळताना घरात दोन फूट लांबीचा कोब्रा साप आला. या मुलाने सापाला खेळणं समजून पकडलं आणि नंतर दाताने त्याचा चावा घेतला. यानंतर लगेचच कोब्रा सापाचा मृत्यू झाला.