आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला,वाणिज्य,विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा.गणेश रखमाजी शेळके यांनी “महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांचा कृषी विकासावर झालेल्या परिणामांचा अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. डॉ. सौ. प्रमोदिनी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या या संशोधन कार्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता देत प्रा. शेळके यांना पीएच.डी पदवी प्रदान केली आहे.
या संशोधनामुळे शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रांद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेती विकासाला चालना मिळणार आहे.प्रा.शेळके यांच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा., जिल्हा परिषद मा. अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, खासदार मा. डॉ. सुजयविखे पा. तसेच संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पा.यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
डॉ. प्रदीप दिघे, डॉ.आर. रसाळ, डॉ.महेश खर्डे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास दाभाडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभल्याचे प्रा.शेळके यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रा.शेळके यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
