नाशिक दिनकर गायकवाड आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाताना भाजप कार्यकत्यांनी पदाचा वापर जनहितेसाठी करावा,असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांनी केले.
दिंडोरी मंडळात भाजपचे संघटन अतिशय महत्त्वाचे झाले आहे.भाजप हा अतिशय वेगाने तालुक्यात सक्षम होत चालला आहे.गरिबांसाठी राबवलेल्या विविध योजना आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे प्रबळ नेतृत्व यावर जनतेचा विश्वास वाढला आहे, असे बच्छाव म्हणाले.
दिंडोरी येथे भाजपची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कैलास धात्रक होते. दिंडोरी मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजी पिंगळ, विलास देशमुख, शाम बोडके, योगेश तिडके, पंढरीनाथ पिंगळ, रणजित देशमुख, शाम मुरकुटे, विवेक कुलकर्णी, फारुक बाबा आदींची भाषणे झाली. यावेळी खतवडचे उपसरपंच सुकदेव खुर्दळ यांनी भाजपत प्रवेश केला. शहराध्यक्षपदी तुषार घोरपडे तसेब महिला तालुकाध्यक्षपदी उज्ज्वला उगले यांची निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.