दाढ खुर्द किशोर वाघमारे श्रीरामपूर मुंबई लोणी निमगावजाळी मार्गे बस लॉकडाऊन काळापासून तीन ते चार वर्षापासून अचानक बंद केल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाची मोठी हाल होत असून या मार्गाने जाणाऱ्या लक्झरी वाल्यांना जास्त भाडे देऊन प्रवाशांना शासकीय सवलती पासून वंचित राहावे लागते महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी अपंगासाठी विविध योजना घोषित केले आहे परंतु श्रीरामपूर मुंबई बस बंद असल्याने वरील नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागते हि बस सेवा तात्काळ सुरू व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
लोणी येथे विविध शिक्षण संस्था असल्याने मुंबई येथील अनेक विद्यार्थी शिक्षण कामासाठी लोणी येथे मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये मुंबईकडे जावे लागते व नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी मंत्रालय सारख्या ठिकाणी जाण्यासाठी बसची खूप गरज आहे.
परंतु सदर बस बंद असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो व या भागांमध्ये दोन ऐवजी चार लक्झरी बसेस जात असून हजार ते बाराशे रुपये एका प्रवाशाचे भाडे बसवाले घेत असून याचा नागरिकांना खूप त्रास होतो त्यामुळे अहमदनगर येथील आगर प्रमुख यांनी नागरिकाची अडचण समजून तात्काळ श्रीरामपूर आगर प्रमुख यांना आदेश करून श्रीरामपूर मुंबई बस सकाळी व संध्याकाळी तात्काळ सुरू करावी अशी मागणी येथील नागरिक वर्गांमधून केली आहे.
