दिल्लीत मतदान चोरी आंदोलन मोर्चा काढल्यामुळे इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Cityline Media
0
नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना वोट चोरी आंदोलन मोर्चा काढल्याबद्दल  पोलिसांनी घेतलं  ताब्यात.
भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन देशात “मतदान चोरी” करत असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सुमारे ३०० खासदार,त्यात खासदार प्रणिती  शिंदे यांचाही समावेश होता

 संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी मोर्चा अडविला. खासदारांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केला यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणितीत शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदारांना पोलिसांनी सर्वांना मार्गातच अडवून ताब्यात घेतलं.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!